Latest

Karnataka Elections : ‘कर्नाटकच्या सार्वभौमत्व’च्या मुद्द्यावर खुलासा करा, निवडणूक आयोगाचे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना निर्देश

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Karnataka Elections : 'कर्नाटकचे सार्वभौमत्व' असा उल्लेख करीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. याबाबत भाजपने केलेल्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून खुलासा मागिवला आहे, तसेच चूक दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोनिया गांधी यांनी कर्नाटकमधील प्रचार सभेदरम्यान 'राज्याचे सार्वभौमत्व' असा उल्लेख केला होता. तर काँग्रेसच्या सोशल मीडिया माध्यमात हीच बाब मांडण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरून काँग्रेसवर प्रखर हल्ला चढवला होता. (Karnataka Elections)

सोनिया गांधी यांनी सदरचे विधान करून लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 29 ए (5) चे उल्लंघन केले असल्याचा युक्तिवाद भाजपने निवडणूक आयोगाकडे केला होता. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर खुलासा करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने काँग्रेसाध्यक्ष खर्गे यांना दिले आहेत. (Karnataka Elections)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT