Latest

Karan Kundrra : करण कुंद्रा दिसणार ‘बाय इन्व्हाईट ओन्ली ‘ या शोमध्ये

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एंटरटेनमेंट क्षेत्रात आपल्या अभिनयाने ज्याने कायम प्रेक्षकांची मन जिंकली असा अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra ) लवकरच काहीतरी खास घेऊन येतोय. त्याच्या हँडसम लूकने आणि अभिनय कौशल्याने फॅशनच्या अनोख्या चॉईसने तो कायम चर्चेत राहतो. करणने विविध प्लॅटफॉर्मवर त्याच्या कामाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. (Karan Kundrra )

सुप्रसिद्ध अभिनेता करण कुंद्रा आणि कुशा कपिला हे रेनिल अब्राहमच्या चॅट-. शोमध्ये सोबत दिसणार आहेत. "बाय इनव्हाइट ओन्ली"मध्ये करण खास पाहुणा आला असून त्याने अनेक गोष्टी बद्दल यात खुलासा केला आहे. तो म्हणतो " बाय इनव्हाईट ओन्ली' चा भाग होण्याची वाट मी अनेक दिवसापासून बघत होतो शेवटी इथे येण्याचा योग हा आला."

दरम्यान, करणने गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशला सरप्राईज दिले. करण कुंद्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर तेजस्वी प्रकाशचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये तेजस्वीला करणकडे पळत येताना दिसत आहे. करण नागिन ६ मालिकच्या सेटवर अचानक पोहोचला. त्याला पाहून तेजस्वी आनंदात तिच्याकडे धावत गेली. यावेळी ती हेवी एम्लेबिश्ड लहंग्यात खूप सुंदर दिसत होती. करणनेदेखील आपल्या लेडी लव्हला आलिंगन दिले.

SCROLL FOR NEXT