पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटांच्या समीक्षणांमध्येही अनेक वेळा 'मॅच फिक्सिंग'सारखी स्थिती असते, हे काही वर्षांपूर्वी अजय देवगण व करण जोहरमध्ये झालेल्या वादातून स्पष्ट झाले होते. आता स्वतः करण जोहरने ( Karan Johar ) चित्रपट समीक्षण आणि रेटिंगबाबत मोठा खुलासा केला आहे.
संबंधित बातम्या
करणने सांगितले की, जेव्हा त्याने फ्लॉप चित्रपट बनवले, नकारात्मक रेटिंग टाळण्यासाठी, त्याने खोटे रिव्ह्यू आणि रेटिंग्स मिळवले, जेणेकरून लोकांना वाटेल की, चित्रपट चांगला आहे. अलीकडेच करण जोहर गलाता प्लसच्या राऊंड टेबल संभाषणात पोहोचला होता.
संभाषणादरम्यान, करणने स्पष्टपणे सांगितले की, त्याने अनेक वेळा वाईट चित्रपट केले; परंतु फ्लॉपच्या भीतीमुळे त्याने बनावट पीआर टीमद्वारे चित्रपटाची खोटी प्रशंसा केली, जेणेकरून लोक चित्रपट पाहण्यासाठी येतील.
त्याने म्हटले आहे की, अनेक वेळा आमची पीआर टीम बनावट लोकांना चित्रपटाची प्रशंसा करण्यासाठी पाठवते. आम्ही असे क्रिटिक शोधतो ज्यांना चित्रपट आवडला आणि त्यांनी 5 स्टार रेटिंग दिले. मग आम्ही त्या लोकांच्या रेटिंगचे मोठे पोस्टर बनवतो. त्यांच्यामध्ये असे काही टीकाकार आहेत ज्यांनी स्वतःच स्वतःचे नावही ऐकले नाही! आम्हाला ते टीकाकार कुठून सापडले हे फक्त आम्हालाच माहीत आहे. चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करतो.