Latest

Chetana Raj : प्लास्टिक सर्जरी करणं पडलं महागात! ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

कन्नड अभिनेत्री चेतना राज (Chetana Raj) हिचे आज वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक सर्जरी करताना तिचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी करताना झालेल्या चुकीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चेतनाने बंगळुरच्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतली. या अभिनेत्रीला सोमवारी 'फॅट फ्री' शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडू लागली. तिच्या फुफ्फुसात पाणी साचू लागले आणि तिचं निधन झालं. रिपोर्ट्सनुसार, चेतनाने वजन कमी करण्यासाठी प्लास्ट‍िक सर्जरी केली होती. (chetana raj)

पालकांचा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्रीने तिच्या पालकांना शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली नाही. ती तिच्या मित्रांसह हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्याचवेळी चेतनाचे पालक डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. डॉक्टरांच्या चुकीमुळेच त्यांच्या मुलीचा अकाली मृत्यू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रुग्णालयाविरुद्ध एफआयआर दाखल

चेतना यांचा मृतदेह सध्या रुग्णालयात आहे. शवविच्छेदनासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येईल. चेतनाच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटल विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चेतनाने 'गीता' आणि 'दोरेसानी' सारख्या डेली सोपमध्ये काम केले आहे.

SCROLL FOR NEXT