Latest

LSD 2 Kamsin Kali Song : युजवेंद्र चहलची पत्नी ‘धनश्री’च्या बोल्ड मुव्ह्जने धुमाकूळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकता कपूर आणि दिबाकर बॅनर्जी पुनहा एकदा प्रेक्षकांसमोर LSD 2 सोबत चित्रपट आणत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे टीजर रिलीज झाले होते, तो खूप बोल्ड होता. आता LSD 2 मधील पहिले गाणे कमसिन कली रिलीज झाले आहे. यामध्ये धनश्री आपले बोल्ड डान्स मुव्हेज दाखवताना दिसते. (LSD 2 Kamsin Kali Song) एकता आणि दिबाकर १३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. हे दोघे २०२० मध्ये रिलीज झालेला एडल्ट चित्रपट LSD नंतर आता या चित्रपटाचा सीक्वल लवकरचं प्रेक्षकांच्या समोर असणार आहे. (LSD 2 Kamsin Kali Song)

मौनी रॉय स्टारर LSD २ चा टीजर रिलीज केला होता. टीझर रिलीज करण्याआधी दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने एक डिस्क्लेमर सोबत प्रेक्षकांना माहिती दिली होती की, LSD २ च्या पहिल्या भागाच्या तुलनेत आणखी बोल्ड असणार आहे.

SCROLL FOR NEXT