Latest

कमलनाथ यांचे पुतणे रातुल पुरी यांना दिल्लीतील कोर्टाने बजावले समन्स

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : खत घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या रातुल पुरी यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने समन्स बजावित 18 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीवेळी हजर राहण्यास सांगितले आहे. पुरी हे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे पुतणे आहेत. अगस्ता वेस्टलॅंड तसेच मोझर बेअर घोटाळा प्रकरणातही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत.

खत घोटाळा प्रकरणात विशेष न्यायालयात पुरी व अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले आहे. त्याची दखल घेत न्यायमूर्ती विकास धूल्ल यांनी पुरी यांना समन्स बजावले. पुरी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याची माहिती सुनावणीदरम्यान ईडीचे वकील नितेश राणा यांनी दिली. खत घोटाळ्यातील अन्य आरोपींमध्ये राजदचे राज्यसभा खासदार अमरेंद्र धारी सिंग आणि इफको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी यांचा समावेश आहे.

.हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT