भोपाळ : वृत्तसंस्था : या निवडणुकीत मध्यप्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री तसेच छिंदवाड्याचे उमेदवार कमलनाथ यांच्या वयालाही वादाचे वलय प्राप्त झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कमलनाथ यांचे वय 80 असल्याचे, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांचे (कमलनाथ यांचे) वय 72 वर्षे असल्याचे सांगितले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कमलनाथ यांच्या वयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
काय झाले राहुल गांधींच्या सभेत?
झाले असे, की शाहडोलच्या सभेत राहुल गांधी भाषण करत होते, यादरम्यान त्यांनी कमलनाथ यांना वय विचारले. कमलनाथ यांनी
72 सांगितले.
कमलनाथ यांचे खरे वय मग काय?
कमलनाथ यांनी छिंदवाडातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यात 18 नोव्हेंबर 1946 ही त्यांची जन्मतारीख नमूद आहे. या हिशेबाने त्यांचे वय 76 वर्षे 11 महिने आहे. येत्या 18 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस असून, या दिवशी ते 77 चे होतील.
… आणि अखिलेश यादव छतरपूरला काय म्हणाले?
दुसरीकडे छतरपूरच्या सभेत अखिलेश यादव म्हणाले होते, काँग्रेसने आम्हाला ओळखले नाही आणि 80 वर्षांचे कमलनाथही तुम्हाला (जनतेला) ओळखणार नाहीत!