Latest

Mirzapur 3 : ‘विसरला तर नाही ना आम्हाला?’ कालीन भैया ‘मिर्जापूर ३’ ची पहिली झलक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mirzapur 3 चे पहिले फुटेज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने जारी केलं आहे. (Mirzapur 3) यामध्ये पंकज त्रिपाठी विचारत आहे, 'विसरला तर नाही ना आम्हाला?' त्याच्यासोबत अली फजल, रसिका दुग्गल, विजय वर्मा देखील दिसले. (Mirzapur 3)

फॅन्स 'मिर्जापूर ३' ची प्रतीक्षा करताना दिसत आहे. पंकज त्रिपाठीची भूमिका कालीन भैया इतकी गाजली की, पंकज त्रिपाठीचे कोणताही फोटो समोर आला तरी कालिन भैय्याचीच आठवण होते. प्राइम व्हिडिओने आथा फॅन्ससाठी 'मिर्जापूर ३' ची पहिली झलक दाखवली आहे. १९ मार्च रोजी #AreYouReady इव्हेंटचे आयोजन मुंबईमध्ये केले होते. यावेळी प्राईम व्हिडिओने ७० चित्रपट आणि सीरीजच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये एक 'मिर्जापूर ३' देखील होता.

मिर्जापूर ३ ची पहिली झलक

इव्हेंटमध्ये प्राईम व्हिडिओने जवळपास ७० सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली होती. यामध्ये 'मिर्जापूर ३', 'पंचायत ३', 'पाताल लोक २' असे मिळून एकूण ४० ओरिजिनल सीरीज आणि चित्रपट सहभागी होते. सोबतच भारताची सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी २९ चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. या इव्हेंटमध्ये 'मिर्जापूर ३' चे पहिले फुटेजदेखील रिलीज झाले आहे. टीजरमध्ये कालीन भैया आणि गुड्डू भैया यांना पाहिले जाऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT