Latest

Kolhapur news : आक्षेपार्ह स्टेटस, तरुणास अटक; कागलमधील तणाव निवळला

दिनेश चोरगे

कागल; पुढारी वृत्तसेवा :  आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवल्याच्या कारणावरून कागल शहरात रविवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या तरुणाला कागल पोलिसांनी अटक केल्यानंतर तणाव निवळला. (Kagal news)

दरम्यान, तणावाच्या पार्श्वभूमीवर कागल बंदचे मेसेज व्हायरल झाल्यामुळे सोमवारी सकाळी मुख्य रस्त्यावरील काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दहा वाजल्यानंतर पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली. सोमवारी आठवडी बाजार असल्याने सर्व व्यवहार सुरू झाले होते. तणावाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसर, खर्डेकर चौक, गैबी चौक, निपाणी वेस तसेच प्रमुख मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. (Kolhapur news)

सकाळी सकल मराठा प्रतिष्ठानच्या वतीने आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनेदेखील भावना दुखावल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, असे निवेदन पोलिसांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, 'त्या' तरुणाच्या वडिलांचे मुस्लिम जमीयतचे सभासदत्व वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काही तरुणांचे मोबाईल ताब्यात

आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासासाठी काही तरुणांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत, तर काही जणांना चौकशीसाठी बोलावले होते. दिवसभर चौकशीचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT