Latest

KL Rahul-Athiya : केएल-अथियाचा संगीत सोहळा, खंडाळ्याहून व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आज विवाहबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा लग्नसोहळा पार पडणार आहे. (KL Rahul-Athiya) दरम्यान, काल रविवारी या दोघांचं संगीत सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या तयारीची लगबग या व्हिडिओतून दिसत आहे. (KL Rahul-Athiya)

याआधी खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. आता या फार्महाऊसवर लग्नसोहळा पार पडणार असून त्याआधी संगीत सोह‍ळ्याचे आयोजन करण्यात आलंय. खंडाळ्यातील फार्महाऊस विद्युत रोषणाईने सजवण्यात आलाय. यावेळी गाण्याचा आवाज येताना दिसतोय. संगीत सोहळ्यात 'आज की पार्टी मेरी तरफ से' गाणं वाजताना दिसत आहे.

रविवारी सुनील शेट्टीने फार्महाऊवर हजेरी लावली. तेव्हा सुनील शेट्टीने माध्यमांशी संवाद साधला. अथिया आणि राहुल दोघांनाही तुमच्याकडे नक्की घेऊन येणार. तुम्हाला जर काही आम्हाला विचारायचे असतील विचारा, असं तो म्हणाला.

SCROLL FOR NEXT