Latest

Supreme Court New Judge : न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून गुरुवारी शपथ घेणार 

backup backup
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे उद्या (दि. २५ गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत.
न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी सुरुवातीला ​​​औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम केल्यानंतर जुलै २००८ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायदान सेवेत आले. पुढे १४ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर न्या. प्रसन्ना वराळे यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
२३ जून १९६२ रोजी निपाणी येथे जन्मलेले प्रसन्ना वराळे यांना शिक्षणाचा व कायदा क्षेत्राचाही चांगला वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा बळवंतराव वराळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय होते. न्या. प्रसन्ना वराळे यांनी आपले शालेय शिक्षण शहादा, शिरपूर, नाशिक इथून पूर्ण केल्यानंतर लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली सुरू केली. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT