Latest

ओडिशात ‘बीजेडी’चा अस्त होणार : पंतप्रधान

Arun Patil

नवरंगपूर (ओडिशा), वृत्तसंस्था : ओडिशात एकाचवेळी दोन यज्ञ होत आहेत. एक यज्ञ हिंदुस्थानात मजबूत सरकारसाठी आणि दुसरा यज्ञ ओडिशा राज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील नवे सरकार स्थापन करण्यासाठी. दोन्ही यज्ञ यशस्वी ठरणार आहेत आणि चार जून ही राज्यातील नवीन पटनायक सरकारची लास्ट डेट असणार आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, रविवारी मी प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत होतो. आज मी महाप्रभू जगन्नाथाच्या भूमीवर उभा आहे. जनता जनार्दनाचा आशीर्वाद मला हवा आहे. भाजपचे धोरण 'बोले तैसा चाले' हेच आहे. ओडिशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने ताकदीने पूर्ण करणार, ही मोदींची गॅरंटी आहे.

आजची तारीख 6 मे आहे. बरोबर 6 जूनला भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल ते निश्चित होणार आहे. भुवनेश्वरमध्ये 10 जून रोजी भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठीच मी आज येथे आलो आहे, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT