पुढारी ऑनलाईन डेस्क : एमी-नामांकित हॉलीवुड अभिनेता जॉनाथन मेजर्स एक्स गर्लफ्रेंड, ब्रिटिश कोरिओग्राफर ग्रेस जाब्बारीला मारहाण आणि छळ केल्याप्रकणी दोषी आढळला. (Jonathan Majors) मारहाण आणि छळ केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर अभिनेता जॉनाथनला मोठा फटका बसला आहे. मार्वल स्टुडियोजने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जॉनाथन मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये कांग- द कॉन्कररची भूमिकेसाठी ओळखला जातो. शिक्षेनंतर मार्वलने त्याला आपल्या सुपरहिरो ब्लॉकबस्टर्समध्ये मुख्य भूमिकेतून हटवलं. (Jonathan Majors)
या दोघांमध्ये मार्च महिन्यात वाद झाला होता. जोनाथन मेजर्स आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये भांडण झालं होतं. कारण, त्याच्या गर्लफ्रेंडने जोनाथनला दुसऱ्या तरुणीसोबत मेसेजवर बोलताना पाहिलं होतं. त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याचा फोन मागितला आणि दोघांमध्ये भांडण सुरु झालं आणि मारामारी झाली. गर्लफ्रेंड्या डोक्याला, पाठीला आणि कानामागे गंभीर जखमा झाल्या. तिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याला मॅनहट्टनमधून अटक करण्यात आली.
मंगळवार, १८ डिसेंबर रोजी एनवायसी जूरीने अभिनेता जॉनाथनला दोषी ठरवलं. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला एक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सोबतच त्याला आणखी एक फटका बसला आहे. त्याला आगामी मार्वल चित्रपटातील मुख्य भूमिकेतून हटवण्यात आलं. मार्वल स्टुडिओजच्या एका प्रतिनिधीने पुष्टी केलीय की, जोनाथनला 'एवेंजर्स कांग डायनेस्टी'सह भविष्यातील एमसीयू प्रोजेक्टमधून हटवण्यात आले आहे.
मेजर्स पहिल्यांदा 'लोकी सीजन १' मध्ये कांग द कॉन्कररच्या भूमिकेत पाहण्यात आलं होतं. त्याला 'एंट-मॅन एंड द वास्प: क्वांटुमेनिया' मध्ये आपली भूमिका पुन्हा साकारताना पाहण्यात आले होते. त्याला 'एवेंजर्स: कांग डायनेस्टी'च्या भूमिकेतून हटवण्यात आले.