Latest

‘भारतीयांबद्दल तक्रार नाही, गुन्हेगार दोषी’, अत्याचार पीडित स्पॅनिश महिलेचा खुलासा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील दुमका येथे सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या 28 वर्षीय स्पॅनिश महिलेने मंगळवारी मोठा खुलासा केला. भारतातील लोकांविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही. ते माझ्याशी चांगले वागले, असे तिने स्पष्ट केले. पीडितेने या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व आरोपींना अटक झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पतीसोबत मोटरसायकलवरून बिहारमार्गे नेपाळला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना तिने आपला विश्व दौरा सुरू ठेवणार असल्याचेही सांगितले.

पीडित स्पॅनिश महिला म्हणाली, 'भारतीय लोक चांगले आहेत. मी लोकांना दोष देत नाही. मी गुन्हेगारांना दोष देते. भारतातील लोकांनी मला चांगली वागणूक दिली. ते खूप दयाळू आहेत. यामुळे मी भारतात सुमारे 20,000 किलोमीटरचा प्रवास सुरक्षितपणे करू शकले.

दरम्यान, स्पॅनिश महिला सामूहिक अत्याचार प्रकरणातील आणखी पाच संशयीत आरोपींना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ संशयीत अटक करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT