Latest

Yogita Chavan : जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण अडकली विवाह बंधनात; पाहा अब्लम

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून अंतरा म्हणजे, मराठी अभिनेत्री योगिता चव्हाण चाहत्याच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत तिने रिक्षा चालवणाऱ्या एका मुलीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. आता योगिताने ( Yogita Chavan ) रिअल लाईफमध्ये अभिनेता सौरभ चौघुले याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे. या लग्नातील काही खास क्षणाचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.

संबंधित बातम्या

अभिनेत्री योगिता चव्हाण ( Yogita Chavan ) हिने अभिनेता सौरभ चौघुलेसोबत नुकतेच मोठ्या थाटामात लग्न केलं. या लग्नातील काही खास फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामव शेअर केलं आहेत. यावेळी योगिताने डार्क ब्राऊन नऊवारी साडीवर ग्रीन कवलरचा ब्लॉऊजमध्ये वनवधूच्या वेशभुषेत खूपच क्यूट दिसत होती. तर सौरभने व्हाईट शेरवानीवर ग्रीन कलरचा शेला- फेटा घेतला होता. तोही खूपच हँडसम दिसत होता. यावेळी कपलच्या गळ्यात फुंलाच्या माळ्या दिसत होत्या. हातात हिरवा चुडा- अंगठी, केसांचा अंबाडा, त्यावर गजरा, गळ्यात दागिने आमि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

'Forever Humsafar ?'. फोटोला अशी कॅप्शन तिने लिहिलीय. या कार्यक्रमात कपल आनंदीत असून दोघांनी रोमॉन्टिक फोटोसोबत डान्सही केला आहे. लग्नातील सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळीही आनंदीत आहेत. दोघे कपल मोठ्या उत्साहात एकमेंकाना हार घालताना आणि सात फेरे घेताना दिसत आहे. हे फोटो शोसल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. या सोहळ्यातील व्हिडिओला जवळपास ७० हाजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT