Latest

जयंत पाटील भाजपमध्ये येणार : शिरसाट यांचा दावा

मोहन कारंडे

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मागील अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र अजून हा विस्तार झालेला नाही. यासंदर्भात शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव जयंत पाटील यांनीच दिला होता. यावर चर्चा झाली होती. माझ्या माहितीनुसार आजही जयंत पाटील केवळ शरीराने तिकडे असून मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. मात्र, ते नक्की येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही शिरसाट यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT