Latest

कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची “गॅरंटी” काय? पेट्रोल-डिझेल दरावर जयंत पाटलांचा सवाल

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची "गॅरंटी" काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले की, निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे. हे आता नित्याचेच झाले आहे. वाढलेले ४० रुपये व कमी केलेले २ रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची "गॅरंटी" काय?

SCROLL FOR NEXT