Latest

Jawan collection : दोन दिवसात जवानची कमाई २०० कोटी पार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा चित्रपट जवानची जादू जगभरात आहे. (Jawan collection) चित्रपटाने दमदार वर्ल्डवाईड कलेक्शन केलं आहे. सोबतच जवानने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. (Jawan collection) जवानचा फर्स्ट डे वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन १०० कोटी पार झाला होता. ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर ६५ कोटींची कमाई झाली होती. एकूण १२९.६० कोटींची कमाई झालीय. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाईड रिपोर्टनुसार, जवानने दुसऱ्या दिवशी जगभरात १०२ कोटी रुपयांचा बिझनेस केला. दोन दिवसांच्या वर्ल्डवाइड कलेक्शनने हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला. दोन दिवसात जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २३१ कोटी रुपयांचे झाले.

भारतात पहिल्या दिवशी शाहरुख खानच्या चित्रपटाने ७४.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीदेखील चित्रपटाच्या कमाईने ५० कोटींचा आकडा पार केला. शुक्रवारी कलेक्शन ५२.५० कोटी झाले. जवानचे एकूण कलेक्शन २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT