Latest

Japan : जपानमधील सर्वात मोठी आतषबाजी!

Arun Patil

बीजिंग : आकाशात पाहणे सर्वांनाच कमालीचे पसंत असते. फटाके फुटल्यानंतर त्यातून अवकाशात पसरणारे विविध रंग आणि प्रकाश डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. योनशाकुदामा ही एक अशीच जापनीज आतषबाजी आहे. वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात मोठी आतषबाजी, अशी त्याची ओळख आहे. या आतषबाजीची चमक थोडीथोडकी नव्हे तर चक्क एक किलोमीटरपर्यंत विस्तारते. याच आतषबाजीचा एक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे. (Japan)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ सर्वप्रथम पोस्ट झाला. या व्हिडीओत ही आतषबाजी कशी रंगत जाते, त्याचे अनोखे चित्रण केले गेले आहे. काही क्षणातच, अगदी डोळ्याचे पाते लवते न लवते, तितक्यात ही आतषबाजी सुरू होते आणि अवघे अवका आपल्या कवेत घेते, असे या व्हिडीओत स्पष्ट होते. आतपर्यंत हा व्हिडीओ 97 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. (Japan)

व्हिडीओच्या प्रारंभी काही लोक क्रेनच्या मदतीने योनशाकुदामा फायरवर्कचे घटक मोटार ट्यूबमध्ये घालतात आणि अवकाशात जाऊन कसे नयनरम्य आतषबाजी सुरू होते, हे दर्शवले गेले आहे. इपिक फायरवर्क्सने दिलेल्या वृत्ताप्रमाणे, या फायरवर्क शेलचे वजन थोडेथोडके नव्हे तर चक्क 420 किलोग्रॅम इतके असते. मोटार ट्यूबमध्ये लोड करून ते अवकाशात पाठवले जाते. आश्चर्य म्हणजे हे शेल तयार करण्यासाठी थोडाथोडका नव्हे तर चक्क एका वर्षाचा कालावधी लागतो.

सेंटीनल युट्यूबने दिलेल्या माहितीप्रमाणे, या आतषबाजीसाठी चक्क सव्वालाख रुपये खर्च येतो. याचा शैल अवकाशात 2700 फुटांपर्यंत जाण्यासाठी सक्षम असतो. आकाशात आतषबाजीची कक्षा 2400 फुटांपर्यंत विस्तारली जाऊ शकते.

SCROLL FOR NEXT