Latest

Japan : अपत्याला जन्म देणार्‍या दाम्पत्याला मिळणार तीन लाख

Arun Patil

टोकिओ, वृत्तसंस्था : Japan : जपानमध्ये सातत्याने तरुणांची संख्या घटत आहे. यामुळे सरकार चिंतेत आहे. अशातच अपत्यांना जन्म देण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी जपान सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. यापूर्वी सरकारने एक अपत्याला जन्म देणार्‍या दाम्पत्याला अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आता यामध्ये वाढ करून बक्षिसाची रक्कम 3 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Japan : यासंदर्भात जपानने आरोग्यमंत्री कात्सुनोबू कातो यांनी पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेत चर्चा केली. येत्या आर्थिक वर्षांपासून अपत्याला जन्म घालणार्‍या दाम्पत्याला 3 लाख रुपये मिळणार आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जपानमध्ये सर्वात कमी मुले जन्माला आली. त्यामुळे सरकारने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Japan : वृद्ध महिलांची संख्या 88 टक्के

जपानमध्ये गेल्या वर्षी 8 लाख 11 हजार मुलांचा जन्म झाला, तर मृतांची संख्या 14 लाख इतकी होती. देशात शंभरी ओलांडणार्‍या वृद्धांची संख्या 86 हजारांहून अधिक झाली असून यामध्ये महिलांची संख्या 88 टक्के आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT