Latest

Jane Dipika Garrett : कशाची लाज? प्लस साईज मॉडेल जेव्हा रॅम्पवर उतरते

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस युनिव्हर्स २०२३ खूप लाईमलाईटमध्ये राहिलं. निकारगुआच्या शेन्निस पालसियोसने यंदाचा मिस (Jane Dipika Garrett) युनिव्हर्सचा किताब जिंकला. पण चर्चेत राहिली ती, नेपाळची सुंदरी जेन दीपिका. जेन ही मिस नेपाळ आहे. ती रुढीवादी परंपरा मोडीत काढत रॅम्पवर उतरली तेव्हा सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. यावेळच्या सौंदर्य स्पर्धेत जेन पहिली प्लस साईज मॉडेल बनली. तसेच तिने रॅम्पवर वॉक पाहून सगळीच तिच्या प्रेमात पडले. (Jane Dipika Garrett)

मिस युनिव्हर्स स्पर्धेत स्लिम ट्रीम सौदर्यवती मॉडेल्स असाव्यात, हा विचार बदलणारी जेन दीपिका ठरली. जेन म्हणते, साईजची परवा न करता स्वत:ला रिप्रेझेंट करायला हवं. बॉडी साईज, बॉडी पॉझिटिव्हीटी सर्व प्रकारच्या स्टीरियोटाईप तिने तोडले आहे. कोणतीही न लाज न बाळगता जेनने नेपाळचे प्रतिनिधीत्व केले.

कोण आहे जेन दीपिका गेरेट?

जेन नेपाळची राहणारी आहे. ती नॉडलिंग करते. शिवाय ती नर्स आणि बिझनेस डेव्हलपरचे कामदेखील करतेय बॉडी पॉझिटीव्हीटी आणि महिलांमध्ये हार्मोनल-मेंटल हेल्थविषयी जागृतीदेखील करते. जेन २२ वर्षांची आहे. ती काटमांडूमध्ये राहते. तिचा जन्म अमेरिकेत झाला होता. आधी ती वॉशिंग्टन डीसीमध्ये राहत होती. नेपाळच्या काठमांडूतून तिने नर्सिंगचे शिक्षण घेऊन बॅचलर पदवी घेतलीय. या स्पर्धेत जेनने २० मॉडेल्सना मात दिली होती. दीपिकाचे जुने फोटो पाहिले तर ती त्यामध्ये मध्यम शरीरयष्टीत दिसते. पण, ती आता प्लस साईज झालीय.

SCROLL FOR NEXT