पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने जम्मू ते श्रीनगर दरम्यान अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे बुधवारी (दि.९) जम्मू ते श्रीनगर येथील श्री अमरनाथच्या पवित्र गुहेची वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पांथा चौक यात्रा बेस कॅम्प ते जम्मूपर्यंत ही यात्रा स्थगित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. (Amarnath Yatra)
माहितीनुसार, १ जुलैपासून सुरू झालेली ६२ दिवसांची अमरनाथ यात्रा ३१ ऑगस्ट २०२३ रोजी संपणार आहे. तत्पूर्वी, जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि विभागीय आयुक्तांनी जम्मू यांनी स्वातंत्र्य दिन आणि १७ ऑगस्टपासून सुरू होणार्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
हेही वाचा