Latest

Adani : ‘पाटगाव’चे पाणी अदानीच्या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजीवडे (ता. कुडाळ) येथील अदानी यांच्या मेगा प्रकल्पासाठी पाटगाव धरणातून पाणी दिल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा अनफ खुर्द पाळ्याचा हुडा (ता. भुदरगड) येथील शेतकर्‍यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन दिला. यावेळी शेतकर्‍यांच्या वतीने निवेदनही देण्यात आले. शेतकर्‍यांच्या हक्काचा एक थेंबही सिंधुदुर्गात जाऊ न देण्याची मागणी मुश्रीफ यांच्याकडे केली.

पाटगाव धरणाच्या पाण्यावर अदानी यांचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी भुदरगडसह कागल तालुका आणि सीमाभागातील जनतेच्या हक्काचे पाटगाव धरणातील पाणी नेले जाणार आहे. माजी आमदार कै. हरिभाऊ कडव यांच्या दूरद़ृष्टीतून हे धरण बांधण्यात आले आहे. वेदगंगा नदीवर हजारो एकर शेती अवलंबून आहे. हे पाणी दिल्यास हजारो एकर जमीन ओस पडणार आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती माहितीच्या अधिकाराखाली जमा केली आहे. या प्रकल्पाला परवानगी देताना, वन विभागाच्या सर्व्हेला परवानगी देताना आणि इतर सर्व कागदपत्रांबाबत अधिकार्‍यांनी कमालीची गुप्तता पाळली असल्याचे अशोक सुतार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT