Latest

जळगाव : आम्ही दगडं मारून सभा बंद केल्यात!

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
खासदार संजय राऊत शिवसेनेच्या कोणत्याच आंदोलनात नव्हते. आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारून लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांनी शनिवारी जळगावात भेट दिली. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना जे नतद्रष्ट लोक आहेत, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, त्यांना आमचा विरोध आहे. मी जळगावात पाय ठेवला, अशी टीका केली होती. यानंतर ना. पाटील यांनी खा. राऊत यांचा समाचार घेतला.

हिंमत असेल तर राजीनामा द्या
संजय राऊत आमच्या मतांवर खासदार झाले आहेत. त्यांची भीती आम्ही कशाला बाळगायची? त्यांच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा. पुन्हा खासदार होऊन दाखवा. आमची मतं घ्यायची, खासदार व्हायचं, पुन्हा आम्हालाच काहीही बोलायचं का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला अक्कल शिकवू नये, अशी टीका ना. पाटील यांनी यावेळी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT