Latest

जळगावमध्ये पोलीस भरती परिक्षेत ब्लूटूथचा वापर, दोघांना अटक; एरंडोल पोलिसांची कारवाई

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे गुरुवारी (दि. १७) दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाइन परीक्षा सुरु असताना दोन विद्यार्थी ब्लूटूथचा वापर करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी जळगाव जिल्ह्याचे परीक्षा प्रमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही परिक्षार्थींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) एरंडोल येथे साई टेक्नाबाईट टीसीएस सेंटरवर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाईन परीक्षा परीक्षा सुरू होती. या परिक्षेसाठी हरियाणा येथून दोन उमेदवार आलेले होते. आशिष कुलदीप दहिया (रा. 162 मोहमदाबाद, जि. सोनपत हरियाणा), दीपक जोगिंदर सिंग (रा. सात दबरा 164 हिसार हरियाणा) असे दोन्ही परिक्षार्थींचे नाव आहे. परिक्षेदरम्यान सिंग आणि दहिया या दोन्ही परिक्षार्थींनी कानामध्ये ब्लूटूथ उपकरण घातल्याचे तपासणीसाठी आलेल्या टीसीएस नागपूरचे परीक्षा प्रमुख सचिन पाटील यांच्या निदर्शनास आले. यानंतर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाट व हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे हे करीत आहेत. दोन्ही परिक्षार्थींना रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

SCROLL FOR NEXT