Latest

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मुक्ताईनगर शहरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला आहे. मयत तरुणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने तसेच दगड व तत्सम वस्तूने वार केल्याचे दिसून येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हलवला आहे. मयत तरुण रावेर तालुक्यातील असल्याचा संशय असून मयताची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT