Latest

Jalgaon Accident News : कारची दुचाकीला धडक! आशासेविका आईसह दोन मुले ठार, एक गंभीर जखमी

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील रामदेव वाडी गावाजवळ सायंकाळच्या वेळेस एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई व तिचे दोन मुले जागीच ठार झाल्याची  दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातातील त्यांचा भाचा १२ वर्षीय मुलगा जखमी असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामदेव वाडी जळगाव येथे राहणाऱ्या आशा वर्कर राणी सरदार चव्हाण (वय ३०), सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७) असे मयत आई व दोन मयत मुलांची नावे आहेत. त्यांचा परिवार मोल मजुरीवर उदरनिर्वाह करत होते. मंगळवार (दि.७) रोजी सायंकाळी राणी चव्हाण तिच्या दोन्ही मुलांना व भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२) यांच्यासह जळगाव येथे कामानिमित्त निघाल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर जळगाव शहराकडून पाचोराकडे रामदेववाडीजवळ चारचाकी वाहनाने (क्रमांक एम एच १९ सीबी 67 67) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राणी यांची दोन मुले रस्त्याच्या कडेला बाजूला फेकले गेले. तर राणी चव्हाण या जागीच ठार झाल्या. सोहन याचाही जागेत मृत्यू झाला. घटनेची माहिती रामदेव वाडी गावातील ग्रामस्थांना मिळाल्याने घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको केला. सोहन चव्हाण व लक्ष्मण राठोड यांना शासकीय  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर सोहन याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यास माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सय्यद फौजदार, अतुल वंजारी व पथक उपस्थित झाले.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

नागरिकांनी आक्रमकपणे रस्ता रोको केल्याने या ठिकाणी दगडफेकी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दंगा नियंत्रणाने दोन प्लॅटून यांना प्रचारण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. या दगड फेकीमध्ये उमेश ज्ञानोबा गायकवाड (वय ३०) व एक महिला पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकी प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी कडून मिळत आहे.

धडक देणाऱ्या चारचाकी वाहनात दोन गांजाच्या पुड्या आढळल्या असून एका बड्या व्यक्तीचे वाहन असल्याचे समजते. त्यामुळे चारचाकीने धडक देणारी व्यक्ती बडी इसम असल्याचे सांगितले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT