Latest

जळगाव : शाळेत प्रार्थना सुरू असताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

गणेश सोनवणे
जळगाव : शाळेत प्रार्थना सुरू असताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ येथे उघडकीस आली आहे. भुसावळ शहरातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात हा विद्यार्थी शिकत होता.
सुयोग भूषण बडगुजर (वय १३) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवार हा शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास वर्गात प्रार्थना सुरू झाली. यावेळी आठवीमधील विद्यार्थी सुयोग बडगुजर याला चक्कर येऊन तो खाली पडला. यावेळी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुयोगच्या वडीलांचे आठ महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आजी, आई आणि बहिण असा परिवार आहे.
SCROLL FOR NEXT