जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुक २०२४ शांततेने तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत भयमुक्त वातावरणात व्हावे, याकरीता चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत तीन गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोकसभा निवडणूक २०२४ शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घातक हत्यारे बाळगून गुन्हे करणारे आरोपी राहुल अण्णा जाधव (रा.चाळीसगांव), शाम उर्फ अण्णा नारायण गवळी (रा. चाळीसगांव), हैदरअली आसिफअली सैय्यद (रा. चाळीसगांव) यांच्या विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी, प्रमोद हिले यांचेकडे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने सहायक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांच्या चौकशी अंती अहवालानुसार राहुल अण्णा जाधव यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षे, शाम उर्फ अण्णा नारायण गवळी यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षे, हैदरअली आसिफअली सैय्यद यास जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यातून दोन वर्षे करीता हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांनी पारित केले आहेत. हद्दपार प्रस्ताव कार्यवाही ही संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस हेड कॉन्सटेबल विनोद भोई, पोलीस नाईक तुकाराम चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा: