Latest

ब्राझीलमध्ये जैर बोल्सोनारो यांना 2030 पर्यंत निवडणूक बंदी

Arun Patil

ब्राझिलिया : ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना 7 वर्षांसाठी म्हणजे 2030 पर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. बोल्सोनारो यांच्यावर पद आणि माध्यमांच्या गैरवापराचा आरोप होता.

ब्राझीलच्या निवडणूक न्यायालयातील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 5-2 अशा बहुमताने हा निर्णय दिला. गतनिवडणुकीत पराभवानंतर बोल्सोनारो यांनी देशाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीवर शंका व्यक्त केली होती. 18 जुलै 2022 रोजी बोल्सोनारो यांनी ब्राझीलच्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

SCROLL FOR NEXT