Latest

बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. गुरुवारी (दि. 1) जय पवार यांच्या हस्ते शहरात विविध ठिकाणी शाखांचे उद्घाटन झाले. एकीकडे राष्ट्रवादीचा शरद पवार गट बारामतीच्या 'होमपिच'वर मोर्चेबांधणी करत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांचा गट अत्यंत सावध झाला असून, त्यांनीही शहरात विविध उपक्रमांवर भर दिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ व जय हे दोघेही 'अ‍ॅक्टिव्ह' झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

विशेषतः जय पवार यांनी बारामतीचे दौरे वाढवले असून विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. गुरुवारी शहरात जय पवार यांच्या हस्ते पक्षाच्या शाखांचे उद्घाटन पार पडले. जय पवार यांच्या दौर्‍यामुळे युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. शहर युवक कार्यकारिणीतील अनेकांना त्यांच्या उपस्थितीत निवडीची पत्रे देण्यात आली. हलगी-ताशांच्या गजरात जय पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. या वेळी त्यांच्यासोबत बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT