Latest

Jack Dorsey : जॅक डोर्सी यांचे आरोप निराधार, उलट ट्विटरच देशाचे…. ; केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांचा पलटवार

backup backup

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 13 : Jack Dorsey : भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर बंदी घालण्याची धमकी दिली होती. या जॅक डोर्सी यांच्या आरोपांचे केंद्र सरकारकडून खंडन करण्यात आले आहे. उलट डोर्सी हेच भारतासोबत भेदभाव करीत होते, असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. डोर्सी हे ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. काही काळापूर्वी त्यांनी आपली कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क यांना विकली होती.

डोर्सी यांनी केलेले आरोप धांदात खोटे असल्याचे सांगून चंद्रशेखर पुढे म्हणाले की, डोर्सी यांच्या कार्यकाळात ट्विटरकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन केले जात होते. वर्ष 2020 ते 2022 या कालावधीत ट्विटरने भारतीय कायद्यांनुसार काम केले नाही. त्यानंतर जून 2022 पासून भारतीय कायद्यानुसार त्याने काम करणे चालू केले. सरकारने कोणालाही तुरुंगात पाठविले नाही, अथवा ट्विटरवर बंदी घातली नाही. मात्र देशाचे नियम पाळण्यात ट्विटरला समस्या होती. Jack Dorsey

भारत एक स्वतंत्र देश आहे आणि देशात संचालित होणाऱ्या सर्व कंपन्यांनी नियमांचे पालन करावे, हा भारताचा अधिकार आहे. शेतकरी आंदोलनावेळी अनेक बोगस बातम्या चालविण्यात आल्या. देशात नरसंहार झाल्याच्या गोष्टी करण्यात आल्या, त्यात कोणतेही तथ्य नव्हते. हे बोगस ट्विट हटविण्याबाबत विचारणा करण्यात आली, कारण त्यावेळी देशातले वातावरण बिघडले असते. मात्र, ट्विटरला बोगस ट्विट हटविण्यात समस्या होती. वास्तविक अशा प्रकारचे बोगस ट्विट त्यांनी आपल्या देशात म्हणजे अमेरिकेत हटविले होते, असेही चंद्रशेखर यांनी सांगितले. (Jack Dorsey)

काय म्हणाला होता जॅक डोर्सी

नुकत्याच यु ट्यूबवर दिलेल्या एका मुलाखतीत ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी किसान आंदोलन काळात भारतातून अनेकानेक मेल येत होते. यामध्ये हे आंदोलन कव्हर करणारे, तसेच याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचे अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती करण्यात येत होती. हे सर्व अशा पद्धतीने वाटत होते की ते ट्विटरच्या भारतीय कार्यालयांवर छापे मारतील किंवा ट्विटर बंद करतील, असे आरोप डोर्सी यांनी केले आहेत. यानंतर ते ट्रोल होत आहेत.

डोर्सी यांच्या या वक्तव्याचे केंद्र सकराकडून खंडन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी जॅक डोर्सीवर पलटवार केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT