Latest

ITR Last Date : Income Tax भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंतच

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयकर विभागाने या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदत दिली आहे. आयटीआर भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आयटीआर भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच आपला टॅक्स भरा, आणि गर्दी टाळा असे आवाहन अर्थ मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. (ITR Last Date)

तीन कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयटीआर दाखल केल्याची माहिती

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी आपला आयटीआर रिटर्न दाखल केल्याची माहिती संबंधित विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी आयटीआर रिटर्न अद्याप दाखल केलेला नाही, त्यांनी लवकरात -लवकर आपला आयटीआर दाखल करावा,  असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे. (ITR Last Date)
जास्तीत जास्त करदात्यांनी आयटीआर भरावा यासाठी आयकर विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. करदात्यांमध्ये सर्व प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT