पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप विरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडातील ( INDIA Alliance ) मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. आता या आघाडीतील मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.
कुपवाडा येथे माध्यमांशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, " इंडिया आघाडीची स्थिती सध्या मजबूत नाही. आघाडीची अशी
स्थिती असणे हे दुर्दैवी आहे. काही अंतर्गत भांडणे आहेत. अशा प्रकारचे भांडणे असू नयेत. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुका असणार्या ५ राज्यांमध्ये तरी अशा प्रकारे मतभेद असू नयेत"
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्र पक्ष समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या लढत रंगली आहे. दोघांनीही उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. हे इंडिया आघाडीसाठी चांगले नाही. कदाचित याबाबत आम्ही पुन्हा चर्चा करु. राज्याच्या निवडणुकांवेळी इंडिया आघाडीचे ऐक्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करु, असा विश्वासही ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :