Latest

Israel-Iran War : “… त्‍यांना किंमत मोजावी लागेल” : इस्‍त्रायलचा इराणला इशारा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास युद्धादरम्यान इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलच्या भूभागावर हल्ला केला. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक डागलेली क्षेपणास्त्रे आम्‍ही रोखली आहेत, असा इस्रायलने दावा केला आहे. या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्‍त्रायलने सोशल मीडियाच्या एका पोस्टमध्ये स्‍पष्‍ट केले आहे की, "आमची लढाई इस्लामिक रिपब्लिकशी आहे, इराणच्या लोकांशी नाही. जे कोणी इस्रायलच्या नागरिकांचे नुकसान करतील त्‍यांना किंमत मोजावी लागले."

इराणने सीरियाची राजधानी दमास्कसमधील आपल्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. हा हल्‍ला १ एप्रिल रोजी झालेल्‍या हल्‍ल्‍यात इराणच्या लष्करी दोन जवानांसह 7 रिव्होल्युशनरी गार्डचे जवान मारले गेले होते. त्यानंतर इराणने इस्रायलचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. इराणने आज पहाटे इस्रायलवर हल्ला केला. यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले. या हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन यांच्‍याशी फोनवर चर्चा केली.

आम्‍ही कधीही दहशतवादापुढे झुकणार नाही

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये इस्रायलने म्‍हटलं आहे की, "कालची रात्र एक दीर्घ रात्र होती, आज सकाळ झाली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आम्ही मजबूत, लवचिक आहोत. आम्ही कधीही दहशतवादापुढे झुकणार नाही. जे कोणी इस्रायलच्या नागरिकांचे नुकसान करतील त्‍यांना किंमत मोजावी लागले."

इस्त्रायल हा लवकरच तो इराणला प्रत्युत्तर देऊ शकतो, असे मानले जात आहे.इराणने संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून आम्ही स्वसंरक्षणार्थ हल्ला केला आहे, मात्र इस्रायलने पुन्हा आमच्यावर हल्ला केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे म्हटले आहे. या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT