पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल-हमास युद्ध जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे. हमास या दहशतवादी संघटनेच्या तळांवर इस्त्रायल लष्कराची धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. दरम्यान, गाझावर अण्वस्त्र हल्ल्याला 'पर्याय' आहे, असे म्हणणारे इस्रायलचे मंत्री अमिहाई एलियाहू यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Netanyahu) यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली आहे. तसेच एलियाहू यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांनी तीव्र संतापही व्यक्त केला आहे.
इस्रायलने हल्ला तीव्र करत असताना गाझावर अणुबॉम्ब टाकण्याचा पर्यायाचा विचार होणार का, असा सवाल मंत्री एलियाहू यांना विचारला असता ते म्हणाले की, "गाझावर अण्वस्त्र सोडणेही हा युद्धातील एक पर्याय असू शकतो."
सरकारी बैठकांमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची चर्चा झाल्याने संतप्त झालेल्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्री अमिहाई एलियाहू यांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. "मंत्री एलियाहू यांचे युद्धात अण्वस्त्र हल्ल्याला 'पर्याय' आहे, हे विधानच निराधार आहे. इस्रायल आणि इस्रायल संरक्षण दल नागरिकांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्वोच्च मानकांनुसार कार्यरत आहे. विजय मिळेपर्यंत आम्ही हे करत राहू,", असेही त्यांनी म्हटले आहे.
इलियाहू यांनी त्यांनी आपले विधान मागे घेतले असून माझे विधान हे "प्रतिकात्मक" टिप्पणी होती, असा दावा केला आहे. आपण दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर दिले पाहिजे. यामुळे नाझी आणि त्यांच्या समर्थकांना स्पष्ट संदेश जाईल की दहशतवाद अर्थपूर्ण नाही. हे एकमेव सूत्र आहे ज्याद्वारे लोकशाही दहशतवादाचा सामना करू शकते, असेही ते म्हणाले.
एलियाहूच्या विधानांना "निराधार" आहे. असे विधान करणारे लोक इस्रायलच्या सुरक्षेचे प्रभारी नाहीत हे चांगले आहे, असे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी देखील एलियाहूच्या टिप्पण्यांचे वर्णन "बेजबाबदार मंत्र्याचे भयावह आणि वेडेपणाचे भाष्य" असे केले आहे.
हेही वाचा :