Latest

Israeli Air Strikes : युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान इस्रायलचा गाझामधील रफाहवर एअरस्‍ट्राईक, १३ लोक ठार

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन ; इस्‍त्रायली बॉम्‍बवर्षावातून आपला बचाव करण्यासाठी रफाहमध्ये मोठ्या संख्येने लोक शरण आले  आहेत. इजिप्तच्या मध्यस्‍थीने हमासच्या नेत्यांशी इस्रायलसोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते, अशा वेळी इस्रायलने बॉम्बहल्ला केला आहे. ज्‍यामध्ये १३ लाेक ठार झाले आहेत.

इस्‍त्रायलने हमासला मुळासकट उखडून टाकण्याचा विडा उचलला आहे. हमासच्या खात्‍म्‍यासाठी सुरू केलेल्‍या इस्‍त्रायलच्या सैन्य ऑपरेशनमध्ये आतापर्यंत तब्‍बल ३४,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे २३ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

हमासच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, खलील अल-हया यांच्या नेतृत्वाखाली हमासचे अधिकारी युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करतील, ज्यामध्ये कतार आणि इजिप्त मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत.

हमासने पुन्हा 'टू नेशन थिअरी'वर करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पॅलेस्टिनी संघटना हमास १५ वर्षांहून अधिक काळापासून म्हणत आहे की, ते इस्रायलसोबत द्विराष्ट्रीय करार स्वीकारू शकताे. पण इस्रायलला मान्यता देणार की त्याविरोधातील सशस्त्र लढा सोडणार हे सांगण्यास हमासने नकार दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT