Latest

obesity : लठ्ठपणाचा संबंध एकटेपणाशीही?

Arun Patil

न्यूयॉर्क : लठ्ठपणा obesity ही आता जगभरातील अनेक लोकांची समस्या बनलेली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी ज्या उपायांचा विचार केला जातो, त्यामध्ये आता एकटेपणा, एकाकी स्थितीचाही विचार केला जात आहे. जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या अभ्यासानुसार, 'लठ्ठ लोकांच्या सामाजिक अलगीकरण आणि एकटेपणाच्या समस्येची काळजी घेतल्यास, आपण त्यांच्या आरोग्यविषयक गुंतागूंत आणि सर्व कारणांमुळे होणारा मृत्यूचा धोका कमी करू शकतो.'

सामाजिक अलगीकरण आणि एकटेपणा या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. सामाजिक अलगीकरण म्हणजे एखादी व्यक्ती आणि समाज यांच्यातील संपर्काच्या पूर्ण अभावाची स्थिती आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास सामाजिक अलगीकरण obesity म्हणजे इतरांशी संबंध नसणे. तर 'एकटेपणा म्हणजे सतत एकटे वाटणे. आपल्याकडे अर्थपूर्ण किंवा जवळचे नाते किंवा आपलेपणाची भावना नाही.' या दोन्ही भावनांचा लठ्ठपणाशी संबंध कसा आहे, हे या संशोधनातून स्पष्ट केले आहे.

याबाबत अभ्यासाचे प्रमुख लेखक लु क्यूई यांच्या मते, 'बहुतेकदा लठ्ठपणा obesity नियंत्रित करणे आणि वजन कमी करण्याच्या धोरणांमध्ये आहार आणि जीवनशैली सुधारण्याला प्राधान्य देताना सामाजिक आणि मानसिक घटकांकडे दुर्लक्ष केले जाते. लु क्यूई हे न्यू ऑर्लीन्समधील टुलेन युनिव्हर्सिटी ओबेसिटी रिसर्च सेंटरचे संचालक आहेत. प्रा. लु क्यूई सांगतात की, 'ंसंशोधनाचे निष्कर्ष असे सूचित करतात की एकटेपणा आणि सामाजिक अलगीकरण या दोन घटकांमध्ये सुधारणा करणे, लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.'

SCROLL FOR NEXT