Latest

लोह तत्त्वाची कमतरता बिघडवते मानसिक आरोग्य

Arun Patil

नवी दिल्ली : शरीरासाठी अनेक प्रकारची खनिजे काही मर्यादित प्रमाणात का होईना अत्यंत गरजेची असतात. त्यामध्ये आयर्न किंवा लोह तत्त्वाचा समावेश होतो. लोहाच्या कमतरतेचा शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतोच, शिवाय मानसिक आरोग्यही या कमतरतेने बिघडते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लोह आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असते, जे महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. हे लाल रक्त पेशींच्या उत्पादनामध्ये मदत करते, ज्या पूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतात.

लोह स्नायूंचे कार्य, रोगप्रतिकात्मक शक्ती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असते. लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया होऊ शकतो. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात योग्य प्रमाणात लाल रक्त पेशी नसतात. अ‍ॅनिमिया लक्षणांमध्ये थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्याची समस्या, डोके दुखी, चक्कर येणे, मानसिक आरोग्य बिघडणे, चिंता यांसारख्या समस्या येतात.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे :

1. लोहाची कमतरता झाल्यास लाल रक्त पेशींची संख्या कमी होते. ज्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे थकवा जाणवतो.
2. लोहाची कमी असतांना शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. खासकरून व्यायाम करताना ही समस्या येते.
3. लोहाच्या कमीमुळे डोकेदुखी वाढते. आयर्नच्या कमतरतेने मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही.
4. लोहाच्या कमतरतेने चक्कर देखील येऊ शकते. कारण लोहाच्या कमीमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
5. लोहाच्या कमीमुळे त्वचा, नखे, केस यामध्ये बदल होऊ शकतो. केस गळू शकतात, त्वचा पिवळी पडून कोरडी होऊ शकते. नखे पातळ होऊ शकतात. आयर्न म्हणजेच लोहाची कमी मानसिक आरोग्य बिघडू शकते. आयरन सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन करते. जे मूड नियंत्रित करते. याकरिता शरीरातील आयर्न कमी होऊ नये म्हणून लोह तत्त्वयुक्त खाद्यपदार्थ भरपूर खावे. अशा आहारात मांस, मासे, बीन्स, डाळ, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, कडधान्ये यांचा समावेश होतो.

SCROLL FOR NEXT