Latest

Ira Khan Wedding : तारीख ठरली! आमिर खानची कन्या इराचे ‘या’ दिवशी लग्न?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी ईरा खान ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिचा बॉयफ्रेंड आणि जिम ट्रेनर नुपूर शिखेरेसोबत ती पुढील वर्षी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. (Ira Khan Wedding ) ३ जानेवारी, २०२४ रोजी लग्न आणि १३ जानेवारीत मुंबईमध्ये रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. (Ira Khan Wedding)

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, हे ग्रँड लग्न असेल. आमिर खान स्वत : चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांना रिसेप्शनसाठी आमंत्रित करणार आहे. इरा आणि नुपूर ३ जानेवारीला कोर्ट वेडिंग करतील. त्यानंतर ते उदयपूर येथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी रवाना होतील.

८ ते १० जानेवारी असे तीन दिवस लग्नाचे कार्यक्रम चालणार आहेत. यावेळी मित्रमंडळी आणि पै-पाहुणे उपस्थित असतील.

इराने २०२२ मध्ये नुपूरसोबतचे नाते सार्वजिनक केले होते. ती तिचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT