Latest

IPL 2024 Retentions : केकेआरने शार्दुल ठाकूरला, तर सीएसकेने प्रिटोरियसला केले रिलीज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Retentions : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडूंपैकी शार्दुल ठाकूरला आयपीएल 2024 पूर्वी मोठा झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघातून रिलीज केले आहे. मात्र, केवळ तोच नाही तर त्याच्यासह आणखी 6 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

मागील सीझनमध्ये शार्दुलची निराशाजनक कामगिरी (IPL 2024 Retentions)

आयपीएल 2024 रिटेन्शन डेडलाइनसाठी काही तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझींनी खेळाडूंना रिलीज करण्यास आणि कायम ठेवण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रिकेदरम्यान, शाहरुख खानच्या केकेआरने शार्दुलला रिलीज केले आहे. केकेआरने शार्दुलला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, त्याने मागील आयपीएल सीझनमध्ये निराशाजनक कामगिरी केली. केकेआरपूर्वी शार्दुल ठाकूर 2018 ते 2021 पर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.

गौतम गंभीर केकेआरचा मार्गदर्शक (IPL 2024 Retentions)

आयपीएलचा 17वा हंगाम पुढील वर्षी मार्चच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे, त्याआधी 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपापली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत कोलकाता नाईट रायडर्सनेही तयारी सुरू केली आहे. या दरम्यान, फ्रँचायझींने सर्वप्रथम गौतम गंभीरला आपल्या टीममध्ये मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला कायम ठेवले

दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना त्याला दुखापत झाली होती. शॉने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात दिल्ली कॅपिटल्समधून केली. (IPL 2024 Retentions)

सीएसकेने ड्वेन प्रिटोरियसला केले रिलीज

द. आफ्रिकेचा खेळाडू ड्वेन प्रिटोरियसलाही चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केले आहे. याबाबत खुद्द प्रिटोरियसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. प्रिटोरियस कोणत्या संघात सामील होईल हे अद्याप सांगता येणार नाही.

वास्तविक प्रिटोरियसने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तीन स्लाइड्स आहेत. त्याने लिहिले, 'धन्यवाद सीएसके. सीएसकेकडून खेळताना मला चांगला अनुभव मिळाला. मी व्यवस्थापन, प्रशिक्षक, खेळाडू आणि चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. पुढील हंगामासाठी शुभेच्छा.' या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिटोरियसची आयपीएल कारकीर्द फार मोठी नाही. त्याने 2022 मध्ये पदार्पण केले. ज्यात तो फक्त 7 सामने खेळला. या कालावधीत त्याने 6 विकेट घेतल्या. 30 धावांत 2 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (IPL 2024 Retentions)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT