Latest

Virat Kohli : आयपीएलमध्ये विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli : आयपीएलचा 19 वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर बंगळुरू संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 183 धावा केल्या. या सामन्यात 113 धावा केल्यानंतर कोहली नाबाद राहिला. मात्र, कोहलीचे हे शतक त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी कामी आले नाही. राजस्थान संघाने 184 धावांचा पाठलाग करताना 6 गडी आणि 5 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला

फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो विराट कोहली नवनवीन विक्रम करण्यासाठी ओळखला जातो. राजस्थान-बंगळुरू सामन्यात त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. याबाबतीत त्याने सीएसकेचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैनाला मागे टाकले. यश दयालच्या चेंडूवर कोहलीने रियान परागचा सुरेख झेल घेतला. या झेलसह कोहली आयपीएलच्या इतिहासात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल (110) घेणारा खेळाडू बनला. आयपीएलमध्ये 100 पेक्षा जास्त झेल घेणाऱ्यांच्या यादीत फक्त तीनच खेळाडू आहेत. ज्यामध्ये कोहली पहिल्या क्रमांकावर, रैना (109) दुसऱ्या क्रमांकावर आणि किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू

राजस्थानविरुद्ध खेळताना कोहलीने आपल्या आयपीएल करिअरमधील आठवे शतक झळकावले. या यादीत तो अव्वल स्थानी असून ख्रिस गेल 6 शतकांसह दुसऱ्या तर जोस बटलर 5 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलच्या 16व्या हंगामात म्हणजेच 2023 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध 61 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.

नकोसा विक्रम नावावर

कोहलीने राजस्थानविरुद्ध 72 चेंडूत 113 धावांची नाबाद खेळी खेळून एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला. कोहलीचे शतक 67 चेंडूत पर्ण झाले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संथ शतक ठरले आहे. याआधी हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्याने 67 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत सचिन आणि वॉर्नरसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

आयपीएलमधील सर्वात संथ शतकांची यादी..

मनीष पांडे : आरसीबी विरुद्ध डेक्कन चार्जर्स : 67 चेंडू (2009)
विराट कोहली : आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स : 67 चेंडू (2024)
सचिन तेंडुलकर : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोची टस्कर्स : 66 चेंडू (2011)
डेव्हिड वॉर्नर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केकेआर : 66 चेंडू (2010)
जोस बटलर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स : 66 चेंडू (2022)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT