Latest

IPL 2024 Auction : आयपीएल मॉक लिलावात स्टार्क,कोएत्झीने घातला धुमाकूळ!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Auction : आयपीएल 2024 (IPL 2024)चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. खेळाडूंच्या लिलावाचा कार्यक्रम पहिल्यांदाच देशाबाहेर होणार आहे. सर्व 10 फ्रँचायझी लिलावासाठी सज्ज आहेत. त्याच वेळी, जिओ सिनेमाद्वारे सोमवारी आयपीएल मॉक लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये एका पॅनेलने खेळाडूंवर त्यांच्या स्वत: च्या मते बोली लावली. या पॅनलमध्ये आकाश चोप्रा, रॉबिन उथप्पा, आरपी सिंग, झहीर खान, पार्थिव पटेल, अनिल कुंबळे, इऑन मॉर्गन आणि सुरेश रैना या माजी खेळाडूंचा समावेश होता. हे खेळाडू वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करत होते.

या मॉल लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी यांनी सर्वांना थक्क केले. आरसीबीने स्टार्कवर सर्वाधिक 18.5 कोटी रुपयांची बोली लावली. माईक हेसनने मॉक ऑक्शनमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. स्टार्कने आपला शेवटचा सामना 2015 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता. तेव्हा तो आरसीबीचा भाग होता. आगामी लिलावासाठी स्टार्कने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. त्याच्यावर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. (IPL 2024 Auction)

कोएत्झीने भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त छाप पाडली. या स्पर्धेत त्याने 8 सामन्यात 20 बळी घेतले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याची ही कामगिरी लक्षात घेता मॉक ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्स (जीटी) च्या प्रतिनिधीने कोएत्झीवर 18 कोटी रुपयांची बोली लावली. त्याची मूळ किंमत 2 कोटी आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स आणि भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांनीही प्रभावित केले. सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या प्रतिनिधीने वेगवान गोलंदाज कमिन्ससाठी 17.5 कोटी रुपये आणि पंजाब किंग्जच्या (PBKS) प्रतिनिधीने शार्दुलसाठी 14 कोटी रुपयांची बोली लावली. दोघांची मूळ किंमत 2 कोटी आहे. (IPL 2024 Auction)

SCROLL FOR NEXT