Latest

IPL 2024 CSKvsRCB : जाणून घ्या CSK, RCB ची प्लेइंग इलेव्हन ‘कशी’ असणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 CSKvsRCB : आयपीएल 2024 ची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने होणार आहे. दोन्ही संघ आज (शुक्रवारी) चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या हंगामाच्या पहिल्या सामन्यात सर्वांचे लक्ष सर्वाधिक तीन खेळाडूंवर असणार आहे. मुलाच्या जन्मामुळे काही काळ मैदानापासून दूर असलेला आरसीबीचा विराट कोहली आयपीएलमधून मैदानात परतणार आहे. तर सीएसकेचा एमएस धोनी एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

सलामीच्या सामन्यापूर्वी धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाला असून त्याने ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. दरम्यान दुखापतींशी झुंजत असलेल्या सीएसकेची मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे आव्हान गायकवाड समोर असेल.

सीएसकेचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूसह सलामी देईल. पण तो डेव्हॉन कॉनवे नसून रचिन रवींद्र असेल. कॉनवेच्या दुखापतीमुळे रवींद्रला पदार्पणाची संधी मिळू शकते. सीएसकेची फलंदाजी तगडी आहे. यात मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी आणि सातव्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. गायकवाडसाठी गोलंदाजी हे चिंतेचे कारण ठरू शकते. कारण मथिशा पाथिराना दुखापतग्रस्त आहे. तो स्पर्धेतील सुरुवातीच्या पहिल्या सामन्यांतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत मुस्तफिझूर रहमानला सीएसकेकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तो दीपक चहर आणि तुषार देशपांडे त्याच्यासोबत तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मैदानात उतरेल. तर महिष तिक्षाना जडेजासोबत फिरकीची जबाबदारी सांभाळेल.

सीएसकेची संभाव्य प्लेइंग 11

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, महिश तिक्षाना.

आरसीबीची संभाव्य प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात कॅमेरून ग्रीनच्या आगमनाने त्यांची फलंदाजीची फळी मजबूत झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तो जबाबदारी सांभाळू शकतो. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला येतील. तर ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. त्यानंतर रजत पाटीदार, दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर येतील. अरसीबीचा वेगवान मारा मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन सांभाळतील. कर्ण शर्मा आणि सुयश प्रभुदेसाई यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि कर्ण शर्मा.

SCROLL FOR NEXT