Latest

Rishi Dhawan: इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नुसताच तंगला! ‘या’ खेळाडूला ना बॉलींग मिळाली ना बॅटींग

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जचा ऋषी धवन (Rishi Dhawan) आयपीएल सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी न करणारा पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या नावावर हा अनोखा विक्रम नोंदवला गेला.

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ऋषी धवनचा (Rishi Dhawan) संघात समावेश केला. पण त्याला गोलंदाजी किंवा फलंदाजीची संधी दिली नाही. पण तरीही संघाने विजयाची नोंद केली. त्यामुळे ऋषी हा आयपीएलच्या इतिहासात मैदानात उतरूनही काहीच न करणारा पहिला इम्पॅक्ट खेळाडू ठरला आहे.

आयपीएलचा 16 वा हंगाम अनेक नवीन नियमांमुळे अधिक रोमांचक झाला आहे. ज्यामध्ये इम्पॅक्ट प्लेयरपासून ते नो बॉल आणि वाइड बॉलसाठी डीआरएस घेण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. हे सर्व नियम आयपीएलमध्ये प्रथमच वापरले जात आहेत. अनेक दिग्गजांनी या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे तर काही जण ते योग्य असल्याचे सांगत आहेत.

धवनने 15 व्या षटकांनंतर इम्पॅक्ट प्लेअरचा घेतला निर्णय

गुवाहाटीच्या मैदानावर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी केली. प्रभासिमरन आणि कर्णधार शिखर धवन यांनी अर्धशतकी खेळी करून संघाची धावसंख्या 197 पर्यंत पोहचवली. धवनने 56 चेंडूंत 9 चौकार, 3 षटकारांसह 86 धावा फटकावल्या. याला प्रत्युत्तर देताना राजस्थानच्या फलंदाजांनीही तुल्यबळ खेळ दाखवला. त्यानंतर गोलंदाजीचा अभाव पाहून शिखर धवनने गोलंदाज ऋषी धवनचा (Rishi Dhawan) 15 षटकांनंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश केला. प्रभसिमरन सिंगला बाहेर बसवण्यात आले.

ऋषी धवन रिकाम्या हाताने परतला (Rishi Dhawan)

राजस्थानची फलंदाजी पाहून धवनने शेवटच्या 5 षटकांसाठी ऋषी धवनचा अतिरिक्त गोलंदाज म्हणून समावेश केला. पण सामना पुढे गेल्यावर शिखर धवनने रोमांचक वळणावर जाऊनही ऋषी धवनला गोलंदाजी दिली नाही. तो फक्त क्षेत्ररक्षण करत राहिला. अशाप्रकारे, आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये ऋषी धवन पहिला खेळाडू ठरला, ज्याने ना फलंदाजी केली आणि ना गोलंदाजीत हात आजमावला. असे असतानाही त्याचा संघ पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT