पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये (IPL 2023) दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) यांच्यातील सामन्यानंतर ऑरेंज कॅप (orange cap) आणि पर्पल कॅप (purple cap) शर्यतीत मोठे बदल झाले आहेत. शनिवारी (दि. 7) पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे दोन दिग्गज संघ आमनेसामने आले होते, तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात डीसीची लढत आरसीबीशी झाली.
या दोन सामन्यांनंतर फाफ डुप्लेसी (faf du plessi) ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या स्टार फलंदाजाने दिल्लीविरुद्ध 44 धावांची शानदार खेळी खेळली, यासह तो सीझन-16 मध्ये 500 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज ठरला. दुसरीकडे सीएसकेचा गोलंदाज तुषार देशपांडे (tushar deshpande) पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध 2 विकेट्स घेत तुषारच्या नावावर या हंगामात सर्वाधिक 19 विकेट्स जमा झाल्या आहेत. त्याच्या मागे गुजरात टायटन्सचे मोहम्मद शमी आणि राशिद खान आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांवर एक नजर टाकूया. या यादीत फाफ डुप्लेसी व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनवे, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. शुभमन गिलला या यादीतून वगळावे लागेल, त्याच्या नावावर सध्या 375 धावा आहेत. यासोबतच डेव्हिड वॉर्नर 330 धावांसह 7व्या स्थानावर पोहोचला आहे.
फाफ डुप्लेसी – 511
डेव्हॉन कॉन्वे – 458
यशस्वी जैस्वाल – 442
विराट कोहली – 419
ऋतुराज गायकवाड – 384
पर्पल कॅपच्या शर्यतीत सामील असलेल्या टॉप-5 गोलंदाजांकडे नजर टाकायची झाल्यास, तुषार देशपांडे व्यतिरिक्त या यादीत मोहम्मद शमी, राशिद खान, पियुष चावला आणि अर्शदीप सिंग आहेत. सीएसकेचा रवींद्र जडेजा आणि आरसीबीचा मोहम्मद सिराज 15-15 विकेट्ससह अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत.
तुषार देशपांडे – 19 बळी
मोहम्मद शमी – 18 विकेट्स
राशिद खान – 18 विकेट्स
पियुष चावला – 17 विकेट्स
अर्शदीप सिंग – 16 विकेट्स