Latest

IPL 2023 Final : राखीव दिवशीही पाऊस पडला तर विजेता कोण? हवामानाची स्थिती जाणून घ्या

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Final CSK vs GT : आयपीएल 2023 च्या महाअंतिम फेरीत रविवारी पावसाने खोडा घातला. सायंकाळनंतर आलेला पाऊस रात्रभर मुक्कामाला राहिल्याने गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील विजेतेपदाची लढत एक दिवस पुढे ढकलून आज (सोमवारी) खेळवण्यात येणार आहे. पण आजच्या राखीव दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्यास सामन्याचा निकाल काय लागेल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

हवामानाशी संबंधित वेबसाइट ॲक्यूवेदरच्या (Accuweather) माहितीनुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी हवामान कोरडे राहिल पण दुपारी 4 ते 6 या वेळेत पाऊस पडण्याची दाट शक्यता 50 टक्क्यांच्या जवळपास आहे. पण त्यानंतर पाऊस थांबल्यास सामना खेळवला जाऊ शकतो. (IPL 2023 Final CSK vs GT)

रविवारी संध्याकाळी 6 नंतरही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नव्हती, पण अचानक हवामानात बदल झाला आणि मुसळधार पाऊस पडला. अखेर पंचांना दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. अशा स्थितीत राखीव दिवशी सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण सोमवारीही अहमदाबादमध्ये पावसाची 50 टक्के शक्यता आहे. दुपार ते संध्याकाळ दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 28 अंश राहील. आकाश ढगाळ राहील आणि त्यामुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. (IPL 2023 Final CSK vs GT)

राखीव दिवशी पाऊस पडला तर? (IPL 2023 Final)

  • प्रथम पंच रात्री 9.30 पर्यंत थांबतील. या वेळेपर्यंत खेळ सुरू झाल्यास 20-20 षटकांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. पण यानंतर, एक तास वाया गेल्यास एकूण 14 षटकांची कपात केली जाईल. जर सामना रात्री 10:30 वाजता सुरू झाला तर एकूण 26 षटकांचा खेळ होईल. दोन्ही संघ 13-13 षटके खेळतील.
  • रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खेळ सुरू झाला तर दोन्ही संघ 5-5 षटके खेळतील आणि विजेत्या संघाचा निर्णय होईल.
    रात्री 12 वाजल्यानंतर जर मैदान कोरडे पडले आणि खेळण्याची शक्यता निर्माण झाली, तर सुपर ओव्हरद्वारे आयपीएल 2023 च्या चॅम्पियनचा निकाल लावला जाईल.
  • पावसामुळे सामना पुन्हा रद्द झाला तर मात्र, लीग फेरीतील गुणतालिकेच्या आधारावर निकाल घोषित करण्यात येईल. त्याप्रमाणे गुजरात टायटन्स हा संघ आयपीएल 2023 चा चॅम्पियन बनेल. कारण या संघाने 20 गुणांसह साखळी फेरीत अव्वल स्थान पटाकावले होते. धोनीच्या सीएसकेच्या खात्यात 17 गुण असल्याने त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT