Latest

IPL पार्टीत महिलेसोबत अश्लील वर्तन! दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूने…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 16 हंगामाचा मध्यांतर झाला आहे. प्रत्येक संघाचे 7-7 सामने झाले आहेत. अशातच एका घटनेमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूने खासगी पार्टीत महिलेशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हीड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची यंदाच्या हंगामातली कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत हा संघ फक्त दोनच सामने जिंकू शकला आहे. परिणामी हा संघ आयपीएलच्या 16व्या हंगामात गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्यातच आता संघातील एका खेळाडूने खासगी पार्टीमध्ये महिलेशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

हा प्रकार लक्षात येताच फ्रँचायझीने तात्काळ दखल घेत, आपल्या खेळाडूंसाठी कठोर नियमावली लागू केली आहे. संघाची प्रतिमा जपण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या नियमावलीत आता खेळाडू रात्री 10 वाजल्यानंतर आपल्या पार्टनरल खोलीत बोलावू शकणार नाहीत. जर खेळाडूंना त्यांच्या पार्टनर किंवा पाहुण्यांसोबत वेळ घालवायचा असेल तर त्यांनी हॉटेलच्या रेस्टॉरंट किंवा कॉफी शॉपमध्ये बसावे, असे फ्रँचायझी प्रशासनाने जाहीर केले आहे.

जर खेळाडू हॉटेल सोडून बाहेर कोणाला भेटायला जाणार असतील तर त्यांनी त्यासंदर्भात संघ व्यवस्थापना कळवणे अनिवार्य असेल. दिल्लीच्या खेळाडूंना या नियमावलीबद्दल माहिती देण्यात आली आहे. जो कोणी खेळाडू या नियमांचा भंग करेल त्याला आर्थिक दंड किंवा त्याच्यासोबतचा करार रद्द करण्यात येईल असा इशाराही व्यवस्थापनाने दिला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंना व सपोर्ट स्टाफला त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत घेऊन प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. पण आपल्या साथीदारांच्या प्रवासाचा खर्च हा ज्याचा त्याने स्वतःच्या खिशातून करायचा आहे. मात्र, आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला हॉटेल रुमवर घेऊन जाण्याआधी खेळाडूंना संघाच्या इंटीग्रेटी ऑफिसरला माहिती देणे आवश्यक असणार आहे. आपल्यासोबत येणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र दाखवल्यानंतरच त्यांना रुमवर घेऊन जाता येईल, फ्रँचायझीने सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT