Latest

IPL 2022 : ‘ऑरेंज कॅप’साठी सहा खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा, बटलरचे वर्चस्व

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर तुफानी फलंदाजी करत 'ऑरेंज कॅप' वर ताबा मिळवून आहे. जोसने तीन दमदार शतके ठोकून यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा बनविणार्‍यांच्या यादीत पहिले स्थान मिळविले असून, आयपीएल सुरू झाल्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून बटलरने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

जोस बटलरने यंदाच्या हंगामात आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्याने या सात सामन्यांत 81.83 च्या सरासरीने आणि 161.51 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने 491 धावा ठोकल्या आहेत. त्याने ठोकलेल्या तीन शतकांमुळे त्याच्या आसपासही सध्या कोणता फलंदाज नाही. मात्र, काही फलंदाज हळूहळू या शर्यतीत पुढे येऊ लागले आहेत.

लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार लोकेश राहुल हाही यंदा दरवर्षीप्रमाणे स्फोटक फलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके फटकावून 368 धावा कुटल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट आहे 147. त्यामुळे 'ऑरेंज कॅप' च्या शर्यतीत तो दुसर्‍या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन हाही वेगाने धावा करत असून, तो 302 धावांसह या शर्यतीत तिसर्‍या स्थानावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट आहे 132.

तसेच चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने 295 धावा केल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट आहे 136. विशेष म्हणजे गुजरात टाययन्सचा कर्णधार असलेला पंड्या गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी बजावत आहे. पाचव्या स्थानावर असलेल्या तिलक वर्माने 272 धावा केल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट आहे 140. सहाव्या क्रमांकावर असलेल्या फाफ डू प्लेसिसने 255 धावा आतापर्यंत झोडल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट आहे 130. डू प्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सांभाळत आहे.

SCROLL FOR NEXT