Latest

ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाडला किती रक्कम मिळाली?

backup backup

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करुन चौथ्यांदा आयपीएलवर नाव कोरले. चेन्नईचा सलामीवीर ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाडने यंदाच्या हंगामात दमदार फलंदाजी करत स्पर्धेत सर्वाधिक ६३५ धावा केल्या. ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाडने फायनलमध्ये २७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलवर नाव कोरल्यानंतर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे.

चेन्नईने विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांना २० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या केकेआरला १२.५ कोटी रुपये मिळाले आहे. संघावर कोट्यवधी रुपयांची लयलूट झाली असली तरी खेळाडूंनाही मोठी रक्कम बक्षिस म्हणून मिळाली आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून फाफ ड्युप्लेसिसला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाडवर हर्षल पटेल पडला भारी

ऋतुराज गायकवाडला तब्बल १० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. इतकीच रक्कम पर्पल कॅप विजेत्या हर्षल पटेलला ( ३२ विकेट ) मिळाली आहे. हर्षल पटेल इतक्यावरच थांबलेला नाही. त्याला गेम चेंजर ऑफ द सिजन या पुरस्काराअंतर्गत हर्शलला १० लाख रुपये मिळाले आहेत. हंगामातील उमद्या खेळाडूचा शोध या अंतर्गतही हर्षल पटेलला १० लाख मिळाले आहे. असे एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस एकट्या हर्षल पटेलने मिळवले आहे.

आयपीएलच्या १४ व्या हंगामात सर्वोत्तम झेल हा पुरस्कार रवी बिश्नोईला मिळाला असून त्यालाही १० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. हंगामातील सपुर स्ट्रायकर शिमरोन हेटमायरला देखील १० लाख रुपये मिळाले आहेत. हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या केएल राहुललाही १० लाख रुपये मिळाले आहेत. याचबरोबर हंगामातील पॉवर प्लेअर हा १० लाखाचा पुरस्कार व्यंकटेश अय्यरने आपल्या नावावर केला. यंदाचा फेअर प्ले ऑफ द सिजन हा पुरस्कार राजस्थान रॉयल्स या संघाने जिंकला.

SCROLL FOR NEXT